Sunday, March 25, 2012

ashch manatl 1

मनाचा थैमान ,
बेफाम लगाम ,
पळत सुटला कुठे ,
गतीचा हि ना भान ....

श्वास हि दमला ,
कसा शिवाशिवीचा खेळ हा,
लपंडाव क्षणाचा ,
मांडला खेळ आयुष्याचा ...

रेसकोर्स नाही जीवन,
इथे नात्यांची आहे गुंफण ,
हरून जिंकतो तो ,
ज्या साठी रडणारे शेकडो ..

रोज चं रात्र मनाला ,
स्वप्नांच्या गावी घेऊन जाते ,
उद्याचा सूर्य कुणास ठाऊक ,
तरी नव्या आशेत काळोख हि निजते ...

परी उत्तर नाही प्रश्नांचे काही
तरी प्रश्नांचे सम्राज जिंकता येत नाही
प्रश्नांच्या वाटा मांडे राखेत हि थाट
जिथे नुसताच देह पुरलेला असतो ..

गरगर फिरतो भोवरा जसा,
आपल्याच धुळीवर,
तसाच जीव गुदमरतो aata,
तुझ्या पायरीवर ....

मी कोण काय कशी ,
नुसताच मनात तंटा झाला,
पुन्हा पुन्हा शोधले मला,
कुठे क्षणात हा गुंता झाला ...

विचात आता वाहू लागले,
शब्द माझे नाहू लागले,
काव्य बनून सजले ते ,
वाह - वाही ही लुटू लागले ...

गूढ काव्याचा कळेना कुणा.
आर्त मनाची एक ना मना
माझेच शोध माझ्या भोवती
श्वास जात्या सारखे दळू लागले ..
========================================================

शब्द आहे फुल सुगंधी ..
शब्द कट्या सम बोचणारे..
शब्द कातर तेज ती ..
शब्दच घाव भरणारे ...

शब्द आहे सरिते सम
डोळ्यातून झरणारे ..
शब्द कधी शीला विशाल ती
अटळ  शेवट पाहणारे ..

शब्द जणू कातरवेळ ..
प्रेम गीत गाणारे.
कधी मेघ वेदनेचे होऊन
मनसोक्त बरसणारे ..

शब्द मोहक रुप आहे
काव्य चे बीज ते
भवनाचा आधार जरी
शब्दाचेच खेळ सारे ...

शब्द कधी साखर पाक..
कधी रस कडू कारल्याचा..
तिखट तुरट आंबट जरी ..
स्वाद जीवनास यांचा चं  ..

शब्द ढाल माझी
शब्द कधी तलवार माझी
लेखणी मध्यम आहे
ओढण्यास लगाम मनाची

शब्द अर्पण करते आज
शब्द्फुलांच्या चरणी ..
जगणे हि माझे शब्दच जणू
काव्य माझी संगिनी  ...
=======================================================================

आपलेच कर्म ना  ते,  मग भोग कोण भोगायचे..
दुसर्यावर आरोप मांडून , कां स्वतः अश्रू गळायचे ...

लाम्बवतच  चालली आहे ..सावली माझी ..
हा सूर्य उगवता कि... निजणारी ज्योती  ...
काय लिहलय कुणास ठाऊक ..अर्धवट रेश्या हाती .
अडकते आयुष्य .. ना तिमिराची साथ हि ....

काय वाईट आहे इथे.. पाषाणा सम जिने..
शीलाचे साम्राज्य हे .. कोण ऐकेल मनाचे गाणे..
मोल नाही इथे ...रक्ताच्या नात्यांचा ..
कसे निभावतील ते ..प्रेमानुबंध  हे ....

Wednesday, February 29, 2012

वेदना

माझी वेदना इतकीच कि
मनाचे तार जुडत नाही ..
मेंदू बोलतो त्याच्या कडे
मान माझे वळत नाही ..

माझी वेदना इतकीच कि
वर्णाचे डाग दिसत नाही  ..
सल उठते उरी पण...
जख्मेची जागा कळत नाही ..

माझी वेदना इतकीच कि
गाण्याचे सूर जुडत नाही ..
धून असते मधुर पण..
ताल काही मिळत नाही ...

माझी वेदना इतकीच कि
हसतांना ओठ बोलत नाही ..
डोळ्यात असत सागर पण..
सागरातली भरती कळत नाही ...

माझी वेदना इतकीच कि
तुझी सावली आता बघवत नाही
असेन आयुष्यभर तुझ्या सोबत
पण तू माझा कधीच नाही ..

मी शब्दात गुंतवते तिला ..


मी च घडवते , मी च मोडते ...
संसार तिचा माझी कल्पना ..
हव तसं रूप देते तिला ...
मी शब्दात गुंतवते तिला ..

कधी वृत्त बद्ध ती ..
कधी यमक जुडणारी फक्त .. 
हव तसं वळण घालते तिला ..
मी शब्दात गुंतवते तिला ..

कधी भावांचा पसारा इथे ..
कधी काट्यांचा आधार तिला ..
मात्रांच्या पाशात कधी अडकवते तिला ..
मी शब्दात गुंतवते तिला ..

कधी थंड गार वारा..
कधी उकळणारा उन्हाळा .. 
कधी ओलीचिंब भिजवते तिला
मी शब्दात गुंतवते तिला ..

कधी गळलेला पान ती ..
कधी ती  स्वप्न तुटलेला ..
उमीद बनून मी जागवते तिला
मी शब्दात गुंतवते तिला ..

कधी क्षणातल क्षण ती ..
कधी उडालेला पाखरू ..
रंग बनून कॅनवासवर रंगले तिला
मी शब्दात गुंतवते तिला ..

कधी शब्दात बांधले ..
कधी अर्थात बोधले..
प्रत्येक ओळीत शृंगार दिले तिला
मी शब्दात गुंतवते तिला ..


  


Wednesday, February 22, 2012

अतृप्त ...

अतृप्त ...


घन बरसले ..
पाणी रिझले ..
माती भिजली ..
तरी पावसाळा अतृप्तच..

वसंत आला..
बागा बहरल्या ..
चोहीकडे आनंद ..
तरी उन्हाळा अतृप्तच ...

काव्य केले..
शब्द रंगविले ..
ख्याती मिळाली ..
तरी लेखणी अतृप्तच ..

ध्येय गाठले ..
महती मिरवली ..
 माया  जमवली ..
तरी मन अतृप्तच ....

    
सांग ना माझ्या वर किती प्रेम करतोस ...

मला नेहमीच प्रश्न पडतो
खरच का मी तुला आवडते ??
रातराणी च्या फुला सारखे तर नाही
प्रेम तुझे माझ्या वर हे ..

==============================================================
 तळमळ मनाची
इवल्या इवल्या कळ्यांचे जेव्हा फुल होते
नजरेच्या कारावासात देह बंदिस्त होते
कसे लपवणार ते फुल तो माळी
तोडण्यास त्याला हात किती तरी पुढे
कधी कधी वाटत का इतक गोजिर रूप तुझ आलं

रंग सुर्ख ओठांवर असा का निखारून आलं
नाजूक कोमल देहास ह्या काटेरी कुंपण तरी
 स्पर्श खट्याळ वाऱ्याचा होऊनच गेल ..

कसा जपू तुला मी माझ्या फुला
काळी होण्या आधीच हा भय मनी होता
जागच्या जालीम पिंजऱ्यात अडकणार जीव तुझा....
========================================================
नियती

सर्वाना हिची वाटते भीती ती नियती ...
नकोस वाटत तरी जागाव लागत
इच्छांच्या बाजारात मनाचा लिलाव कराव लागत
नको असणारे सर्व खेळ ती खेळून जाते
नको असणारे सर्व उपहार देऊन जाते
नियती पुढे कोण वदे....
 


तुझ्या माझ्यात फक्त एकच डाव तिने खेलना
स्वप्नांचा संसार क्षणात मोडला
रिक्त झाले मान.. भास न उरलेले
कसे गहिरे घाव ते नियतीने दिले
कसे नियती पुढे कोण वदे 

भोवळ आल्यावर जसे गडद नजरे पुढे
न सुटणारे चक्रव्यूह ते  ..
खोलात अजून ओढून  नेते
काळातच नाही कुठे मार्ग भरकट जाते
असे च खेळ खेळते नियती..
=======================================
पाखराचे थवे आतुर उडण्यास
त्या पंखाना फक्त क्षितीज हवा...
डोळ्यात स्वप्नांचा डोह
स्वप्नांत आशेचा मोह
आशा पूर्ण करण्यास
मनाचा ध्यास हवा...
 जीवनास श्वास
श्वासास स्पंदने
स्पन्दानास तू
जिंकायला  तुझा
सहवास हवा .. ...
============================

ती : अरेय कुठे आहेस ??
तो : अगं  आलोच , खूप ट्राफिक आहे अडकलो ग इथे.
ती : ओक . सावकाश ये .मी वाट बघत आहे .
तो : हो दिसतेस मला तू ....
ती : काय ??
तो : हो , किती आतुर आहे भेटण्या साठी. एक क्षण पण सुखाने बसली नाहीस . कधी या विचारत कधी त्या विचारात. सर्वाना नाहालताना परत आपल्या दोघांच्या विचारात. मग मध्ये मला शिव्या घातलेस .. "अजून कसा आला नाही , किती उशीर करतोय.. जा मी आता अजून थांबणार नाही " .. काय बरोबर न ??
(अस तिच्याशी बोलत बोलत तू तिच्या पुढे येतो.)
ती : म्हणजे तू इथेच होतास तर ..
तो : हो , तुला बघत होतो ..
ती  : मग का असा लपून बसलास .. ??
तो : तुझ्या मनाचे खेळ दुरून ऐकायचे होते... तुझा आतुरतेने वाट पाहणारा चेहरा माझ्या डोळ्यात टिपायचा होता.. तुझ्या लटक्या रागाला प्रेमाने ऐकायचं होत म्हणून
ती : जा , मी नाही बोलणार तुझ्याशी .. किती वेळ पासून मी इथे एकटीच बसली आहे..आणि तू माझी माझी गम्मत बघत बसलास.
तो : किती वेळ झाल ग .सांगशील का ??
ती : तास भर तरी झाला असणार ..
तो : (हसतो आणि तिचा हातात हात घेऊन म्हणतो ).. अरे , तू इथे येऊन फक्त १० मीनत झालीत .. आणि तू ते १० मिनिट १० वर्ष सारखी घालवली .. हेच मला बघायचं होत ग .. तुझ माझ्या वरच प्रेम.
ती : पुरे आता..:)
तुला भांडताना मी उगाच रुसावे
शब्द माझे तुज्या ओठांवर हसावे
त्या शब्दाना गुंफून तू  काव्य करावे
कव्यातच मी हरवून जावे ..

शब्द शब्दात तुला शोधावे
लेखनितुन तुजे रूप पजरावे
तुला वर्णित कविते मधे
कव्यातच मी हरवून जावे ...

असह्य होतात त्या भावना सुचेना कसे बालू त्याना
मग चालू होते विचारांची धडपड
गोंधळलेल्या मनाला तुझी ओढ़ ...

तुझ्या आठवणीचा ज्वर पोहोचला १०० डिग्री वर
कसे हे उन्हाळे मी झेलणार
कधी तुझ्या प्रेमाचा श्रावण बरसणार ...

जालीम दुनिया के दस्तूर अजीब है

कोई जलाता है भीगे मौसम में
किसी की तड़प की तपन से कहर है  


मांडतो जेव्हा सये वेदना कागदावर
तो हि पुसतो डोळे तेव्हा लेखणीचा पदरावर  

महफिल जी रंगवते 
ती गझल माझी असते
पण शब्द शब्द त्याचा 
फक्त तुझ्या साठी सजते ....   

तू चिंब भिजून माझ्या पाशात आली
जणू फुललेली वेळ ती श्रावणात नाहली
ते लाजाळूचे झाड हि लाजले असेल तेव्हा
पाहून तुझ्या मुखावर लाजलेली गुलाबी आभा   ...

तुझे रूप आधीच गोजिरे कविते
सईच्या रूपांनी ते मोहक  अजून होते  ...

गुलाबाचे फुल टिपताना सये
काट्यांचा दुख मनात येतो
कळी पासून फुला पर्यत साथ त्याची असते
आणि मी त्याचा प्राण हिसकावून आणतो

तो चंद्र हि आज ढगाआड लपला
पाहून तुझा गोजिर मुखडा

चला परत त्या दूर देशी
स्वप्नाच्या कुशीत
तुझ्या सवे
स्वप्न प्रीतीचे सजवायला
हळूच पापण्या खालून मग
स्वप्नात तुझ्या रंग भरायला ...
   
नको सजना दृष्ट लावू चंद्र लागल जाळायला
शब्द शोधता झाले वैरी कविता लागली रडायला

तुला कळते का रे माझ्या मनाचे झोके
कसे मांडतोस तंतोतन ह्या वेड्या मनाचे ठोके..

जुन्या क्षणांची जुनीच गाथा नव्याने मांडूया
हरलेल डाव आज पुन्हा एकदा खेळूया ...

आसवांची शिदोरी माहेरी दिली
सासरचे काटे वाट सोडेना आता ...

किती अजून जपून तू चालशील सख्या
एक दिवस जगणेच विसरशील जगात या ...

अपेक्षांचे घर कधी श्रीमंत नाही
जसे भेटले तसे निभवावे
...

किती अजून खेळणार शब्दाचे खेळ तू
मनातल्या भावना जड झालाय का आता ..???

पुन्हा मना एक कवितेत भर तू
शब्दात तुझ्या मला उतरायचे आता ...

मी टाकाऊ करार देऊन ते
पुसतील का ह्या देहाला
शब्दाचे पोकळ वार से वेदनेचे तीर झाले
असहनीय हे आता मनाला  


सागरात किती हि भारती हो गंगेची
क्षार त्याचा  संपेल कधी का  ???

उजाड ह्या जगात प्रेमाचा झरा
तरी रिता केला वेदनेचा घडा...

चला आता निषे ने दिली साद आम्हा
उद्या भेटू मेहफिलत तुमच्या
नवीन प्रश्न सोडवायला
शुभ घ्यावा आता...

शुभ रात्री ....

आणि मी हरवले ....

आणि मी हरवले ....

तुला बघताच मनाचे  गुलाब उमलले
प्रीतीचे रंग त्यास उतरले
रूप इतके मोहक होते कि
माझीच मी हरवले ..

तुला बघतच नजर हि भुलली
मनात प्रेमाची कळी उमलली
क्षणात जसा श्रावण बरसला
प्रीतीचा मोगरा मनात फुलाला
बघून तुझे रूप ते भुरळ मनाला पडले
आणि माझीच मी हरवले...


ते तीक्ष्ण नजरेचे तीर
पाकळी सम ओठांचे नूर
दवा प्रमाणे  सजलेले शब्दांचे काहूर
चिब भिजले शाहारलेले अंग
आणि मनात विचारांचा द्वंद  ..
 हे पाहून मी अवचित अडखडले
आणि माझीच मी हरवले ..

तू जवळ येण्या आधीच स्वप्न रंगविले
तुझ्या श्वासाच्या स्पर्शाने मोहरले
धुंदी डोळ्यात होती प्रीतीची
मनात दाटलेली भीती रातीची
वाढलेले स्पंदनाचे ठोके ऐकून
माझीच मी हरवले....  

स्पर्श तुझा जणू श्वावन सरी ओघळल्या अंगावरून
रोम रोम रोमांचित झाला तुझ्या मिठीत विसावून
भुलले मी जगाच्या रिती तुझ्या कवेत ..
त्या प्रीतीच्या पाशात अडकून
माझीच मी हरवले .....

 त्या डोळ्यांचे भाव नजरेने टिपले
ओठांवरचे नाव हळूच मी वेधले
तुझ्या मनाच्या हिंदोळ्यावर झुलताना
माझीच मी हरवले.... 
 
कधी होकार कधी नकार
कधी शब्दांना शब्दांचे घाव
असे शब्दांचे खेळ तुझ्या सोबत खेळले
पण प्रेमाचे ते शब्द ऐकून
माझीच मी हरवले .... 

चिंब पाउस, भिजलेले पाखर
शाहारलेले पान , दाटलेले मेघ
अश्या चिंब ऋतू मध्ये
तूझे हातात हात घेताना
माझीच मी हरवले ....

चालत होती वाट पण दिशा सापडेना मनाला
तुझ्या पाऊलखुणांचा आधार मी घेतला
शोध तुझा घेताना तुला जवळून जाणले
तुझ्या निखळ हास्यावर मन माझे फासले
आणि माझीच मी हरवले ...
 
तुला आठवणे क्रम नाही माझा
 पण विचारातून तू बाहेर पडतस नाही
तुला मांडायचे म्हणते शब्दात
पण शब्द काही जुडत नाही
ह्या जोडण्या तोडण्याच्या नादात
तुझ्या विचारात रमले
आणि माझीच मी हरवले

तुला सांगायचे होते सख्या

काय मनात गुपित मी ठेवले
पण तू समोर येताच
माझीच मी हरवले 

तू नसलास तरी तुझे आभास आहे
तुझा माझ्या क्षण क्षणात  वास आहे
वाऱ्याचा स्पर्श हि तुझी आठवण देतो
गंध फुलांच्या आठवणीच्या बागेत नेतो
खेळ तुझ्या आठवणीचे सतत चालू ठेवले
त्यात रमताना माझीच मी हरवले

त्या सागरकिनारी आज मी एकटीच होते
काल सोडलेल्या पाऊलखुणा निहाळत
अजून हि टवटवीत होते
नाव प्रीतीचे त्या तटावर
त्या गारव्यात परत तुलाच आठवले
आणि माझीच मी हरवले ...

तुला इतक जवळून कधी पहिलेच नाही
तुझे शब्द कधी ऐकलेच नाही
fakt तुझ्या स्वप्नाचे घरटे होते मनात
तू समोर येताच जसे चांदणे नभातून उतरले
आणि माझीच मी हरवले 
 
त्या सूर्याला दिसणार कसा प्रकाश दिव्याचा
अस काही माझा प्रेम आहे
तुझ्या जवळ असून नाही
तूच नादान आहे .... 

मी पणती तुझ्या प्रीतीची सख्या
सतत पेटत राहीन प्रेमात आपल्या
तू साथ दे ते  पात्र बनून
साठवून ठेव मला मनात आपल्या .

तू पणती मी वात

तुझ्या मुळे माझ्या आयुष्यास सुरवात
सांग ना देशील का शेवट पर्यंत साथ

मी जळत होते तुझ्या विरहात ज्वलंत
पणती बनून तुझ्या आठवणीची साथ होती
पण त्या हि तू हिरावून घेतल्या
आता वातीची झाली राख होती .. 
फक्त एकदा 

तुझ्या सोबत जगायचे आहे
रडत रडत थोड हसायचे आहे
स्वप्नांच्या गावात रमायचं आहे
एक छोटस घर सजवायचं आहे
फक्त एकदा...

माझ्या सोबत जागून बघ
त्या पहिल्या पावसात भिजून बघ
चोरून पाहणाऱ्या चांदण्यांना 
चंद्राच्या कुशीत निजताना बघ
फक्त एकदा...

तो मावळता मावळता आणि 
घरट्यात परतणारी  पाखर
शांत त्या सांझ वेळी
भाव मनाचे बोलायचे आहे
फक्त एकदा...

तस तर रोजच भेटतो बोलतो आपण
भांडतो आणि समजूतही काढतो आपण
तरी तुझी वाट बघून मला लटका राग धरायचं आहे
खऱ्या अर्थाने त्या तुझ्या प्रेमाला
मनाच्या कोपऱ्यात जपायचं आहे नेहमी साठी
फक्त एकदा ...

खूप काळजी  घेतोस  माझी
यात वाद च नाही
फुला सारखा जपतोस मला
अजून काय मला दुजी आस राहील
तुझ्या नजरेत मला
स्वतःला विसरायचे आहे
 फक्त एकदा...

सांगना येशील का त्या अवकाशात
जिथे फक्त तू आणि मी
आणि अबोल शब्दांचा करवा
मग मी सांगेन अजून काय मला
सांगायचं आहे
जुनी च ती  कविता  तुझ्या साठी
मला वाचायची आहे
समजून घेशील ना मला
फक्त एकदा....

तुझ्या आठवणीत चिंब भिजायचं आहे
थेंब बनून तुझ्या पापण्या खाली लापयचं आहे
शब्द बनून ओठान वर सजायचं आहे
भावना बनून हृदयात नांदायचं आहे
फक्त एकदा ..

मला तुझ्या होकाराची वाट आहे
नको आयुष्याची साथ पण
क्षणात आयुष मला जगायचं आहे
रोज नव्याने तुझ्या विश्वात मला फिरायचं आहे
आठवणीचे घरटे बांधण्यास तुझा सहवास मला हवा
फक्त एकदा.. 

खोट खोट पण एकदा तरी हे बंध प्रेमाचे जोडून बघ
श्वासात माझ्या श्वास तुझे एकदा गुंफून बघ
हात हात घेऊन पूल पूल मोजून बघ
एक एक क्षण तुझ्या फक्त माझ्यासाठी ठेऊन बघ
फक्त एकदा.. 

प्रवास माझ्या च एकटीच तुझा शोध घेण्यास सख्या
सावली बनून राहीन मी सदैव तुझ्या पाशी सख्या
तू ओढ ह्या मनाची.. दोर जीवनाची...
तू आसमंत माझा .. मिलन आपुला क्षितिजा परी
क्षणिक भेट हि मंजूर मला..तू साद देऊन बघ
फक्त एकदा ..

शृंगार माझा तुझ्या साठी
हातावर मेहंदी तुझ्या साठी
तुझी बनूनच शेवटा माझ्या
तुझ्या बहुपाश्यात विसावायचं आहे
नेहमी साठी ...पण
फक्त एकदा... 

==========================

ती :- आज roseday  आहे.. आज पासून valentine week चालू झाला, तुझी काय spcl plan आहेत का ??
तो :- प्लान्स ?? अग , कसले आहेत प्लान्स ... आणि हे बघ ह्या सर्व गोष्टीत मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. सर्व बेकार कल्पना आहेत. उगाच देखावा..
ती :- किती उन रोमान्तिक आहेस रे तू ... तुला प्रेम विषयी खरच काही वाटत नाही. मला तर doubt  येत तू माझ्या वर प्रेम करतोस ते.
तो :- मग मला संग हे अस सिलेब्रातीओन केल्या मुले तुला खात्री पटेल का माझ्या प्रेमाची ??
ती :- खात्री चा प्रश्न नाही आहे.. पण अरे हे दिवस सर्व प्रेमी साजरे करतात म्हणून मला पण करायचं आहे.
तो :- बघ तुला काय करायचं ते कर, मला अजिबात जमणार नाही.
(ती  थोडी दुखावली जाते कारण खूप काही विचार केल असत तिने ..त्याच्या साठी सुर्प्रीसेस असतात तुच्या कडे.. पण त्याच्या ह्या कल्पनेने सर्व स्वप्न तुटता तिचे म्हणून )
तो :- अग रागावलीस का ??
ती :- नाही रे ..
तो :- मग का गाप झलिओ एकदम ..आणि तुझे डोळे का पाणावलेत..
ती :- काही नाही रे .. बोल तू ..
तो :- अग वेडे, माझा प्रेम आहे तुझ्या वर हे सांगायला मला स्पेसिफिक दिवस लागत नाही.. माझ्या साठी पूर्ण आयुष्य . आयुष्याचा प्रत्येक दिवस,, दिवसाचा प्रत्येक क्षण.. आणि त्या प्रत्येक क्षणात फक्त तू ...आणि फक्त तू आहेस..
ती :- मग त्यातला एक दिवस तू मला तो प्रत्येक क्षण ..तुझा प्रत्येक स्वप्न .. सजवून दाखवला तर.. बोलून दाखवला तर.. हे दिखावा आहे का..मला फक्त एका दिवसाठी ह्या जगातली सर्वात नशीबवान मुलगी म्हणून थोडा गर्व करायचा आहे.. मग कुठे चुकते मी सांग ना...
तो :- तू फक्त एक दिवस म्हणतेस ..मी तुला रोज .. प्रत्येक दिवसा चा प्रत्येक क्षण असाच साजरा करू इच्छितो.. मग कुठे चुकते.
ती :- :) खरच इतक प्रेम करतोस का रे ??
तो :- नाही.. फक्त तुझ्या प्रेमाच्या त्या गहारेला माप्न्याचा पर्यंत करत अहो.. कारण तुझ्या एवड मी तुला कधी च प्रेम करणार नाही..
ती :- तू मला न मागता खूप काही दिलास.. क्षण क्षणात नवा आयुष्य दिलस.. मी खरच खूप नशीबवान आहे..
तो :- अग प्रिये ..मग आता हि तुला वाटत का कि मी वेलेन्तीने सिलेब्राते करत नाही म्हणून माझ प्रेम खोट आहे..
ती :- I M SOORRYY .. मी रागात बोलून गेले रे..
तो :- मला खरच हि वेडी खूप आवडते.. आणि तिचा हा हक्क गाजवणारा लटका  राग सुद्धा...
ती :- :) 
-------------------------------------------------------------------------------------------

दिवस कसे कोण जाने
येणारे येतात जाणारे जातात
येताना काहीच घेऊन येत नाही प्रेमाशिवाय
पण जाताना मात्र खूप काही घेऊन जाता
आणि मग उरतात त्या फक्त आठवणी ...

मग त्या आठवणी मी कुरवाळत बसते
क्षणांना त्या आठवत बसते
खेळ मांडतो तिथे मन भावनांचा
त्या मनाशी मी एकटीच खेळत बसते

होड लागली असते त्या क्षण मध्ये
कुणाचा डाव प्रथम मी खेळणार
पण मी कधीच जिंकत नाही कारण
प्रेमाचा डाव म्हणजे फक्त हरणे ...

===============================================



मनाच्या कप्प्यातून ...

मनाचा भेद अजून हि मला उमगला नाही ..
काय खरं ? काय काल्पनिक ? काहीच कळेना ..
कधी एकटाच असतो तरी गुंतलेला..
गर्दीत असला तर हरवलेला..
असा कसा विचित्र स्वभाव रे तुझा...

आज का? खिडकी बाहेर डोकाऊन बघतोस ..
कुणाची वाट आहे का ??? कोण येणार आहे का ??
तुझ्या ह्या अंधारात डोम्बायला येणार तरी कोण  ..
माझ्या शिवाय आहे का तुझा कोणी सख्या ...
नशीबच तुझा खोटा...

कस रे तुझ अस जगन माझ्या मना ..
न संगती तुझ्या कोणी .. न कुणाची उणीव तुला ..
खरच कारे  tu  मातीचा पुतळा फक्त स्वप्नात  भाराकातणारा ??

Tuesday, February 21, 2012

मी आणि माझी ती खोली

मी आणि माझी ती खोली
चार भिंती आणि एक खिडकी
खिडकीतून दिसणारे तुझे रूप गोजिरे
नजर पुन्हा पुन्हा जडते त्या पटलावरती ...
रंगांचे खेळ खेळतोस नभी ..
कधी तांबडा कधी केशरी ..
उधळण नव किरणांची ऐसी
ढगाने नेसली जणू भारी जरदारी ...
हिरवे हिरवे शालू पांघरून 
नाचते पालवी उरावरी ..
रूप निहालता तुझे हसतो 
तो वारा वेली पाशी ...
पाखर भिजली .. घरट्यात निजली ...
दूर देशी असे त्यांची स्वारी ..
इवले इवले पंखांचे
स्वप्न क्षितिजापरी .... 
काळी काळी उमलली ..
सुगंध पसरला चाहु दिशा
किलीबिलाट पक्षांचा
मोहरून आला निसर्ग जसा...
तुझीच वाट चाराचाराला
कणा कणाला ध्यास तुझा
सर्व जगाला जगवणाऱ्या
नारायणला नमन माझा...

तरी मी प्रेम केलं.आणि करत राहील ..

तू

मी पहिल्यांदा पाहिलं नजर चुकलीच नाही..
तुझ्या नजरेला ती कधी भेटलीच नाही ..
तरी मी प्रेम केलं ..
न होती काही अशा ..न कधी स्वप्न रंगवले..
तुला बघताना फक्त शिंपल्यात मोती साठवले..
तुला याची जाणीव नाही न कधी होईल ..
तरी मी प्रेम केलं .. आणि करत राहील ..
मग एकदा तू बोलले तुझा अवज ऐकायचं होता
माझा नाव कसा घेशील त्या ओठांवर बघायचा होता
पण तू मला नाही पुकारले तेही मी स्वीकारलं ..
तरी मी प्रेम केलं ..आणि करत राहील ..
पुन्हा एकदा अशीच भेट आपली घडली ..

मी क्षणाची साथ आयुष्य म्हणून अजून हि मनात जपली ..
पण तुझ्या आठवणीत ते क्षणच राहिले नाही
तरी मी प्रेम केलं ..आणि करत राहील ..
असाच प्रवास चालत होतं..
काळ लपंडाव खेळत होत ..
मी तुला मागत नवते आयुष्य
कारण तू नाहीस माझा हे मला ठाव होत ..  
तेव्हा हि मी मला आवरू शकले नाही ..
तरी मी प्रेम केलं.आणि करत राहील ..
 प्रेमाचा प्रत्येक डाव मी हरले
रडले, कोसळले  तरी सावरले
प्रेम फक्त प्रेमासाठी उरत नाही
 तरी मी प्रेम केलं.आणि करत राहील ..
तुझ्या सहवास नको मला कधी
तुझ्या मैत्रीची हि आस नाही
प्रेमाचे चार शब्द मला कधी हि मिळणार नाही
सर्वच माहित होत मला तरी मलाच मी फसवल
हसला जग माझ्यावर.. रुसवा स्वतःशीच मी धरल
पण काय तुला जरा हि प्रेम माझा नव्हता कळल ...
 तरी मी प्रेम केलं.आणि करत राहील ..
===================================================================
किती हि येऊ दे वादळ वारा
प्रेमाच्या वाटा असतात कठीणच थोड्या
गारव्यात जसे शहारतो पानं
जसे चातकाला शिशिराच्या आगमनाचे ध्यान
तसे काही प्रेम माझे ...
 

कॅनवास आणि मी

मी चित्र कोरले मनाच्या क्यान्वासवर
रंग संगती जमेना आता
संग सख्या येशील कां
उमटून दिसतील सर्व रेश्या ???

तो कॅनवास प्रथमच पहिला आणि मनात आला
माझ्या मनाचा कोरा करकरीत कोपर्यात पडलेला
एक कोण... त्या कॅनवास सारखाच

मी रेखाटल्या दो तीन रेश्या आणि लक्षात आले निसटलेले क्षण
उडालेले रंग आणि ते निरागस जीवन...

परत त्या चित्र पुसले ..कॅनवास ला पाण्याने धुतलं
पण तरी उमटलेल्या त्या रेश्या काही फिक्कटश्या अजून तिथेच होत्या

खूप पर्यंत केला जुना चित्र पूर्णपणे खोदण्याचा
पण त्या कॅन्वासला हि त्यांचा लडा लागला होता
आणि तो काही त्यांना सोडेना आता ..

ते रंग पुसून नवीन रंग भरायचे होते
एक नवीन आकार चित्रास द्यायचे होते
पण हट्टी त्या रेश्या ...जागाचं धरून बसल्या
अडीयल घोडय प्रमाणे जणू होत्या रुसल्या ..

किती तरी रंग होते मी कपाटात ठेवले
कुंच्यांचे होते आयुष्य वाट बघत सरले
पण कसे सांग मी त्यानाही जीवन देणार
त्या रेषांचे आधी साम्राज्य कसे खोडणार ...??

=============================================================
 
लाल पिवळा निळा.. रंगांशी मी खेळते..
श्वेत चकमकीत कॅनवासवर .. कुंचीचे सडे सोडते ...
कधी प्रेमाचा ... कधी मैत्रीचा ..
कधी निखळ नात्याच्या स्पर्शाचा..
आठवणीचा रंग भरभरून त्यात भरते ...
श्वेत चकमकीत कॅनवासवर ..  रंगांशी मी खेळते..
एक तुझा.. एक माझा ..
एक आपल्या सुखद क्षणाचा..
कधी स्मित ...कधी रुसवा ..
कधी ओघळणाऱ्या त्या सरींचा  ..
अश्या निरनिराळ्या रसाने त्यास सजवते
श्वेत चकमकीत कॅनवासवर ..  रंगांशी मी खेळते..
स्वतःशीच बोलतो कधी.. मनाचे द्वंद चाळतो कधी..
निरागस प्रतिमेची .. अनुभूतीही देतो  कधी ..
मूक राहून माझ्या शब्दांना .. रंगत उधळते ..
श्वेत चकमकीत कॅनवासवर ..  रंगांशी मी खेळते..
 ============================================
रंग ..
कॅनवास सजतो रंगानी .. एक नवा रूप त्यास मिळतो..
मिळवलेल्या रुपला मात्र .. आपल्या पासून परका करतो ...

उमटलेल्या छटा .. ठळक दिसतात आज फलकावर ..
आठवणीचे रंग ते .. कॅन्वास्च्या पटलावर  ...

कोण आपले कोण परके .. इथे जाळले किती तरी घरटे ..
रंग नवे नवे बांधून बघते .. नवीन भावना मांडून बघते ..
कधी सजवून ती कातरवेळ   .. तुझी माझी भेट ..
कधी ती पाहत उगवती .. आणि दुरावा तुझ्या माझ्या मधी ...
असे काही परत परत मिटवून बघते ..
सजवून बघते..
कारण कॅनवास आणि माझे नातेच वेगळे....
==================================================== 
कधीच अपूर्ण चित्र तो ..आज हि अपूर्णच आहे..
ना रंग संगती कळते त्यात.. ना अर्थाचा बोध आहे..
जीर्ण दशा त्याची .. पुन्हा पुन्हा आठवते..
होता कोपर्यात पडलेला .. मला बघत थबकलेला..
असे वाटे जणू मला काही प्रश्नच विचारते ..
कर पूर्ण आज तरी अशी साद घालते ..
इथे ना रंग आहेत .. मग उधळ करू कशाची..
ना रस आहे .. मग भास देऊ तुला कशाचा ..
सर्व अपूर्ण स्वाप.. उडालेले रंग. .विसंग संग  ..
उरले ते फक्त विरुद्ध रंग ....
==================================================== 
 
खुबदा प्रयतज्ञ करूनही क्यांवासात तो उतरत नव्हता
तो माझा, क्यानव्हास माझा तरीही गाळ वाढत होता
शेंवटी ठरवले क्यानवास कोराच ठेवायचा
समोर नुसत्या आठवणींचा रंग भरायचा
...............
आज कळले तू कुठेच नव्हतास
तू फक्त अवती भवती वावरत होतास
माझ्या प्रेमाचा धाग्यातील एक भास होतास
जो गुंफता गुंफता गुंता होऊन वाढतच गेलास
..................
आता मी क्यानव्हास गोळा करते त्यात मला उतरवते
डोळ्यातील अश्रूंनाही उगाच एक वाट मिळते
अधून मधून तू येतोस त्यातील चित्र पाहिला
पण तुझ्या कोरड्या नजरेला जमेल का भाव ओळखायला
==================================================== 

as kahi tari .. lihat gelel..

आता इथेच थांबावे ....

कधी तरी वाटत .. खूप जगेल आयुष्य ..
उरले नाही काही .. अजून अनुभवायला..
क्षण क्षण असा.. आठवणीत आहे माझ्या ..
जसा जिवंत भूतकाळ .. वर्तमान मध्ये रंगलेला..

असे वाटत तुझ्या सवे जगताना..
हे क्षण पाण्यासारखे गरठावे..
त्या बर्फ झालेल्या क्षणांना ..
मी स्पर्शून हुर्हुरावे ...

कधी तरी वाटत .. हा प्रवास संपूच नये..
तू हातात हात घेऊन चालताना..
पाऊल कधी थांबूच नयेत ...

आता पुढे प्रवास करताना फक्त तुझी साथ हवी.
नको संपूर्ण आयुष्य मला..
पण क्षणा क्षणात तुझी  साद हवी ..

असे जगले मी ..तुझे सवे जगताना..
जसे दवाचा आयुष्य लाभते त्या पानांना..
रुपरंग गुलमोहराचे होते सोबती माझ्या
गंध प्राजक्ताचा आणि उफान्लेल्या लाटा..
 चांदणे हि लाजले होते बघून मिलनाच्या राती..
हि दृष्ट त्या चंद्राची .... तुटल्या जन्मांच्या गाठी
  =============

सुना था कभी दर्द का कोई इलाज नहीं होता..
नासूर है जख्म ये इनका दर्द नहीं होता..
फिर क्यों आज लफ्ज़ तेरे यु जज्बातों से खेल जाते है..
कभी दवा बन सुकून देते है
...... कभी दिल पर वार कर जाते है ..

लबो की हसी देख ली .. नम आंखे भी पहचान ली होती..
लौटने से पहले ..हालत दिल की जान ली होती..
खैर कोई बात नहीं ..खुदा रहमंत बरसे..
तू जहा भी जाये .. बस खुशियाँ ही पाए ...
===========================================
कसे असावे.. कसे नसावे ..
सांगणारे बहुत मिळाले ..
जसे असावे .. तसे जगावे ..
अस कोणी बोललच नाही ...
=======================================

जगावे असे कि श्वासाला अभिमान व्हावा ..
यमाच्या पदरातून प्राण त्याने हिसकाव ..

वांझ नाही कल्पना त्यांना हि फुलू द्या
एक बीज कल्पनेचा मातीत मेंदूच्या मुरु द्या ...

जिने असे कि सार्थक का जन्म व्हावे ..
जेव्हा मिटतील डोळे  स्वर्गातून यान यावे ...
======================================================
======================================================
स्वप्न बघ कसे उडू लागले..
कल्पनाच्या बघेत फुलू लागले..
अभिलाशेच्या हिंदोळ्यावर ..
बघ कसे झुलू लागले..
वाऱ्यासंगे डोलत आहे..
लाटांवर त्यास तोतल आहे ..
जरी कांचेसम रूप त्यांचे ..
तरी मनसोक्त भिरभिरत आहे ..
निजलेल्या पापण्यांना ..
बघ किरणांची जगवले..
नव्या पहाटे स्वप्नाचे ..
घर पुन्हा आठवले..
======================================================
======================================================
विचारांचे मनात  द्वंद असावे
मेंदूशी त्यांचे भांडण असावे

शब्दांचे मोकळे अंगण असावे
भावनांचे त्यात प्राजक्त पडावे

अश्रुना नाही कुठे हि वाट
ओठांवर फक्त स्मित सजावे 
स्पंदने चालता म्हणून जगणे नाही
जीवनात नेहमी संघर्ष असावे
मोल नाही इथे प्रेमाचा
नात्यांमध्ये असे बंध असावे
उंच उडण्यास पंख नाही
आत्मशक्तीचे पाठबळ असावे
तुटलेल्या स्वप्नांना
काटेरी कुंपण असावे ..
श्वासाचा गणित मांडतांना
प्रत्येक श्वास जगण्याचे धडे सांगावे ...
=======================================

इथे असेच चलते ..

पदोपदी विवेचना
विडंबना हि जोहते
तरी पुन्हा विचार हे
नवी दिशा शोधते  ...

जीर्ण्य जरी जाहल्या
उरी आज वेदना
तरी पुन्हा रुंदन हे
चिंब भिजवून जाते ..

आधी नाही अनादी आहे
नशीबाचे खेळ हे
काल जे अनुबंध इथे
आज ऋण मागते ..
 =============================
 
किती अजून दाबून धरशील हुंदका उरी 
कर प्रहार शब्दांचा हे शब्दच तुझे वैरी ..

उधळण निसर्गाची रमणीय कशी ..
सजली धरणी जणू नववधु जशी
कुठे शोधीशी काशी धरातलावर वेड्या..
मातीच्या सुगंधात स्वर्गाची वारी ...
==========================================================

फुलां मागे काट्याचे असणे.. तीरा मागे लाटेचे धावणे ..
क्षितिजाची ओढ पाखरांना .. मृगजळाचे खेळ वाटसरूंना ...
रहस्य जीवनाचे लपले कुठे कसे , कधी कोणी शोधले काय ??

ललाटरेषा  कधी कुणास उमगल्या काय ..??
===========================================================

कळी  उमलणार .. फुल बनून सुगंध दरवळणार ..
तो भृंगा येणार आणि स्वप्न तिचे तोडून जाणार..
आमचे अस्तिव जरी नसले तरी हे क्रम बदलणार का ??

ऋतुचक्र चालणारच.. उन्हाळा हिवाळा पुन्हा पावसाला ..
श्रावणाच्या सारी.. वसंताची मंद मंद स्वारी ..
चातकाच्या प्रतीक्षेत शिशिराचे आगमन
आमचे अस्तिव जरी नसले तरी हे क्रम बदलणार का ??
===================================================

सिक्का उछाल के ..
 क्या सच और झूठ का पता चालता है ..
क्या किसी के नसीब का दरवाजा खुलता है ..
फिर क्यों लोग कहते है .. देखे कौन जीतता है बाज़ी ..
सिक्का उछाल के ....
किसी की हार .. किसी की जीत ..
सिक्के की किसमत ही फूटी ..
साथ देना चाहो जिसका
उससे ही बैठी है रूठी ..
फिर बोलो कैसे ये खेल खेला जाता है..
कैसे किसमत का फैसला होता है ..
सिक्का उछाल के  .
.===================================

पाझरत जावे डोंगरातून .. निर्मल शीतल झरे बनून ...
मग त्या शीतल झऱ्यांची नद होईल .. वाहून येईल चराचरातून ..
मग .. तहानलेली सृष्टी सारी.. वर्षावाने नाहून जाईल ...
मग ... पुढे प्रवास त्या झर्याचा डोंगराच्या कपारीतून ..सागराच्या पायाशी ..संपेल इथेच सर्वस अर्पुन
मनाचे हे मृगजळ खरच कधी कळेल का कुणा ?
क्षणिक सुखासाठीँ... व्यर्थ भरकटत राहतो पुनःपुन्हा !
.
मनाचे भाव सख्या हिंदोळ्यावर झुले ..
जसे मळ्यामध्ये पिकं वाऱ्यावर डोळे ...

गेले आले दिवस विसरून जायचं ..
जगाचे तेच जे डोळ्या पुढे दिसायचं  ..

=============================================================



Thursday, February 16, 2012

manatlya kavita...

उधळून रंग सारे .. एक चित्र रेघाटला
मात्र काळ्या रेघाने .. सर्वस्वी पुसला  ..

डाव जिंकण्यास तो ... शतरंज खेळला..
एकाच त्या प्याद्याने ... साम्राज्य जिंकला ..

घडून गेले महाभारत .. जुगाराच्या खेळात कधी
पण तोचं जुगार आज .. जीवनाचा जुगाड बनला ..

कधी हसत होती .. रेष नशिबाची हाती ..
आज त्याच नशीबापुढे .. रडताना पहिले ..

सावल्यांची गर्दी .. व्यथा मनाची ..
कभी संपणार हि वाट काटेरी क्षणाची ..
===================================================

लाल पिवळा निळा.. रंगांशी मी खेळते..
श्वेत चकमकीत कॅनवासवर .. कुंचीचे सडे सोडते ...
कधी प्रेमाचा ... कधी मैत्रीचा ..
कधी निखळ नात्याच्या स्पर्शाचा..
आठवणीचा रंग भरभरून त्यात भरते ...  
श्वेत चकमकीत कॅनवासवर ..  रंगांशी मी खेळते..
एक तुझा.. एक माझा ..
एक आपल्या सुखद क्षणाचा..
कधी स्मित ...कधी रुसवा ..
कधी ओघळणाऱ्या त्या सरींचा  ..
अश्या निरनिराळ्या रसाने त्यास सजवते
श्वेत चकमकीत कॅनवासवर ..  रंगांशी मी खेळते..
स्वतःशीच बोलतो कधी.. मनाचे द्वंद चाळतो कधी..
निरागस प्रतिमेची .. अनुभूतीही देतो  कधी ..
मूक राहून माझ्या शब्दांना .. रंगत उधळते ..
श्वेत चकमकीत कॅनवासवर ..  रंगांशी मी खेळते..
 ============================================


Wednesday, February 15, 2012

कविते आज तुझ्यावर मी कविता लिहायची म्हणते ....

हटकून आज मी काही खास करायचं म्हणते
कविते आज तुझ्यावर मी  कविता लिहायची म्हणते ....

खूप झाले मांडून कौतुक सख्याचे..
भांडण क्षणाचे ..  लटके राग मनाचे..
आज मी तुझ्या मनतले आर्त पिळायचे म्हणते
कविते आज तुझ्यावर मी  कविता लिहायची म्हणते ....

गळती पानाची..उसासे वनाचे  ..
चटके उन्हाचे ..असे भोगलस  भोग शब्दांचे
म्हणून आज जखमेवर फुंकर घालायचं म्हणते
कविते आज तुझ्यावर मी  कविता लिहायची म्हणते ....

गारव्याचे वर्णन... श्रावणाचे आगमन ..
चिंब भिजलेले कण कण .. असे रुजले दव अर्थाचे
म्हणून आज त्या शब्दांना उब द्यायची म्हणते ...
कविते आज तुझ्यावर मी  कविता लिहायची म्हणते ....

कधी घरकुल सजवलस तू.. कधी उद्वस्त होताना पाहिलास..
बंध प्रेमाचे जुड्तांना ..तुटतांना पाहिलास...
म्हणून आज मी तुला मुक्त करायचं म्हणते..
कविते आज तुझ्यावर मी  कविता लिहायची म्हणते ....

कोणी लिहले आर्त भाव .. कोणी मांडला प्रश्नांचा डाव..
शब्दांचे खेळ तू जिंकताना ..हरतांना  पाहिलास ...
म्हणून आज तुला निशब्द कराच म्हणते
 कविते आज तुझ्यावर मी  कविता लिहायची म्हणते ....

Tuesday, February 14, 2012

kahi tari ashch

हास्य जरी ओठी ...शिप्ल्यात मोती आहे
काय सांगू सजना .. वेदनेचे गीत ओठी आहे ..
तू गेलास ऐसा निघून ..पुन्हा नजर ती न वळली
मी इथेच होती उभी .. निहारात तुझी छबी ..
तोडून गेलास वाचन तू .. मोडून स्वनांचा झोपाळा ..
संग सजना कुठे बंधू  ..तुझ्या विना निवारा ..
मी शोध तुझा घेण्यास केला.. आसमंत एक सारा ..
आता निजते निरोप दे रे .. आवरून प्रेमाचा पसारा ..

===============================================

तुझ प्रेम माझ्या साठी फक्त आठवण नाही ..
एक एक क्षण आयुष्याचा फक्त साठवण नाही ..
श्वास आहे .. जीव आहे. .. अर्थ जगण्याचा ..
उगाच नाही माझा हट्ट हा तुझ्या सवे काही क्षणाचा ..

तुझ्या येण्याने एक नावच रंग आलाय आयुष्यात माझ्या ..
आठवा रंग प्रेमाचा जणू इंद्रधनुष्यात त्या ..
तुझ्या येण्याने आनंदाचे झरे पाझरू  लागले..
स्मित ओठी सजलेले संग लपवू ते निशाण कसे ...
 लाजले मन थोडे .. थोड्या झुकल्या पापण्या ..
तुझ्या चाहुलीने वाढली हृदयी स्पंदने    ..
तुझ्या येण्याने आयुष्य बहरून आलाय वसता जसा..
सुगंध प्रेमाचा दरवळला मोहरल्या चाहु दिशा  ..

==============================================
साथ तुझी हवी मला ...

शांत कातरवेळ ती ..एकांतात हरवलेली ..
प्रीती तुझी हवी आहे ..त्या दुरावलेल्या वाटे वरती ...

बरसून जाणारे मेघ नको ..नको त्या श्रावण सारी ..
रिमझिम बरसणारी सदा .. हवी साथ मला तुझी ...

जाई-जुईची बाग नको.. नको सुगंधाची वारी ..
रानफुलांना सुखावणारी मला वाऱ्याची ती झुळूक  हवी ..

शब्दांचे खेळ नको .. त्यांच्या अर्थाच्या निवारा दे ..
दुजावा नको भावनेचा .. आस आठवणीचा पसारा दे ..

गडद सर्वत्र पास्लेला .. तुझा साथ हवा आहे ..
तिमिरातून तेज कडे मला मार्ग हवा आहे ..

सृष्टी नको सारी मला.. प्रेमाची वृष्टी दे ..
तुझ्या विश्वासाची फक्त मला .. आयुष्य भर दृष्टी दे ...

श्वास पासून दुरावा नको .. शब्दांचा पुरावा नको ..
खाचणाऱ्या मला माझ्या तुझ्या मिठीचा आधार दे ..

आयुष्य तुझा नको मला.. प्रत्येक क्षणात तू हवा आहेस..
प्रत्येक क्षण वाटावा कि .. आयुष्य तो नवा आहे ..
=======================================================

Friday, February 10, 2012

ram

मी प्रेम केल फक्त तुला ..
प्रत्येक क्षण ...प्रत्येक श्वास सोबत ..
मी फक्त तुझीच होते ..
प्रत्येक शब्दत ..प्रत्येक आठवणी सोबत ... 
मला फक्त तूच पाहिजे...
प्रत्येक वळणावर ..प्रत्येक प्रवासात माझ्या..
माझी नेहमीच साथ तुला ..
प्रत्येक संकटात ..प्रत्येक दुःखात तुझ्या ..
तू स्वच्छंद आहेस ...असाच राहा ..
मी कधीच घालणार नाही बंधन तुला...
मी नेहमीच जपीन तुझ्या माझ्या भूमिकेला आयुष्यात
देऊन मोकाट वाट त्यांना
मी जपीन तुझा माझा स्वातंत्र नात्यात अपुल्या ....
तुझी आवड .. तुझे स्वप्न ..तुझी प्रत्येक इच्छा ..
मी माझी म्हणून जगीन .. कधीच नसणार दुजावा तिथे
जिथे तू तिथे मी असेन ...
तू विश्वास ठेव तुला कधी उणीव भासणार नाही ..
मी तुझ्या प्रत्येक नात्याला पूर्णपणे न्याय देईन ...
मी फक्त प्रेयसी नाही .. ना तुझी अर्धांगिनी ...
तुझा मित्र ..तुझी मैत्रिणी .. तुझ्या प्रवासाची संगिनी ...
खुप मोठे असे स्वप्न मी तुला दाखवू शकत नाही
पण छोट्या छोट्या प्रयत्नाने नक्कीच आयुष्यात
आनंद भरभरून  आणीन ..
तुला हसताना मला खूप आवडतोस त्या स्मितसाठी ..
मी आसमंत एक करेन ...
तुझी साथ फक्त इतकीच नाही
त्या बियराच्या पेल्या पासून ..
........ प्रत्येक मौज मस्ती मध्ये पूर्ण सहभाग राहील ..
लग्नाच्या बेड्या.. कारावासाच वेडा.. कधी हि तुला भासणारा नाही ...
तू फक्त तू बनून राहशील आणि .. मी आपले अस्तित्व असेच जपीन
सख्या...
तू माझा जीवन, माझा श्वास, माझा हृदय ..माझी आत्मा आहेस..
माझा क्षण माझे शब्द माझे काव्य तू आहेस...
माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक रंगत तूच आहेस...
मला पूर्ण करणारा तू तो कान आहेस...
मी खरच नशीबवान आहे .. तुझी साथ मला लाभली ..
तुझ्या सोबत जाण्याची एकच इच्छा बाकी ...
 अजून कुणाची हि मला वाट नाही.. तू तो आहेस ज्यात मला सर्व काही मिळाल
अपेक्षा पेक्षा जरा जास्तच तू मला दिल ..
मी मनापासून आभारी आहे.. तुझ्या त्या प्रत्येक क्षणासाठी..
" कसे साठवू इतक प्रेम ?? " असे प्रश्न पडणाऱ्या प्रेमासाठी ..  
तू मला इतक दिलास ओंझाल भरून वाहू लागली..
माझे शब्द हि अपुरे पडतील ..
इतक आयुष्य मी तुझ्या सोबत आनंदाने जगली ..

शेवटी इतकच मला तुला सांगायचे आहे..
माझ्या आयुष्य तुझ्या शिवाय कोणी ना आले .. ना येणार आहे ..
तूच माझा वर्तमान ..आणि भविष्य आहेस...
मी फक्त तुझीच रे ....
पण वचन कस देऊ .. ..जर नाहीच पुरली आयुष्याची साथ तर करशील न मला माफ  ....



Thursday, February 9, 2012

वृक्ष

vision ...

तुटलेली फांदी .. मोडलेला कणा ..
गळलेली पानं ..अशी क्षीण अवस्था ..
कधी तरी .. कणखर उभा होता ..
त्या गगनाला स्पर्श करण्याचा ध्यास त्याचा..
पण समय कधी थांबतो कुणा साठी ..
निजला बोटी बोटी प्राण त्याचा....
.
.
तो जीर्ण जरी आज पडलेला खोड आहे
पण जीवांशी त्याची जोड आहे..
शेवटच्या श्वास पर्यंत लढतो तो "वृक्ष"  
.
.
माणूस काही वेगळा नाही.. 
पण परोपकारी नसतात वृक्ष सारखे..
आपले घर आणि सुख पोटी 
करतात स्वतःलाच स्वतः पासून परके ...
.
.
एक दिवस असेच स्वप्न घेऊन ..
पापण्या मिटायच्या आहेत..
पण त्या आधी बघ जमात्का..
स्वाभिमानाने जगायचे आहे...    

Tuesday, January 24, 2012

तूच एकटा

तू चंद्रापरी आहेस ..चांदण्यांच्या पाशात
किती तरी तुझ्या साठी पण त्यांच्या साठी तू एकटाच...

तू भृंगा फुलांवर बागडणारा .. मधुरसाच्या मोहात 
किती तरी कळ्या उमलल्या बागेत पण त्यांच्या साठी तू ऐकतच ...

तू सागर उफानलेला  .... तरंगाचा खेळ तुझ्या उरावर ..
पण त्या तीरासाठी तूच एकटा लाटांच्या भेटीस्तव...

 तू शरदाचा पाउस .. उन्माद मनी रचणारा
पण तहानलेल्या चकोरासाठी तूच एकटा रिझवणारा 

तू ब्रह्मांडातील तेजपुंज .. विखुरला किरणांनी भू मंडळ
पण जीवना साठी सूर्याचा अस्तित्व एकटा ....
तू स्वप्नांच्या कवडस्यात लपलेली एक इच्छा
पण पापण्याखाली सजलेलेल्या बागेत तूच एकटा ..

वेदनेचे कारण हजार आहेत पण
वर्णाच्या डागत दिसतोस तूच एकटा ..

हसण्याचे कारण कोण विचारते इथे
पण गालावरची खळी  बघणारा तूच एकटा  ..
 
अश्रू पाहून नाना रित्या प्रश केले त्यांनी
पण त्यांना विसावा देणारा  तूच एकटा  

गडद सर्वत्र ...काजवेही घरी परतले आज 
 पण अश्या तिमिरातही साथ देणारा तूच एकटा ..

Saturday, January 7, 2012

charolya...

ओळख ते अश्रू सख्या हसण्या मागे दळलेले
अबोल शब्द माझे तुझ्या विरहात रळलेले
 हात हात घेण्यापूर्वी माझ मन मला विचारतो
काय ग तो खरच तुझ्यावर जीव ओवाळतो.. ????


मी निवडुंग सम होते त्याच्या नजरेने नाकारलेली
माझे अस्तित्व हि मलाच कधी कळले नाही
मी होते बाभळी रानातली
प्रेमा पुढे गुलाबाचे काटे हि सलले नाही

तू भृंगा आहेस स्वच्छंद वावरणारा
 मी तो फुल तुझ्या प्रतीक्षेत झुरणारा

विरहात सख्या गोडवा किती
गारवा हि मग हुरहूर घालतो
गोड गोड तुझ्या आठवणीत
तो श्रावण मज भिजवून पाहतो...   

परतीची वाट सख्या मी बघणे नाकारले
तू गेलास सोडून मला जेव्हा ते स्वप्न तिथेच ताडले...

गुंता हा शब्दांचा मला हि सुटेना
तुझ्या प्रीतीचा धागा तोडता तुटेना

का तुला तुझ्या काव्यात फासतोस
शब्दात माझे रूप मोडतोस
मी आहे उन्मुक्त पवन सखी
घे भरारी माझ्या छावेत अशी
पुन्हा भासे कधी हि कुणाची
तुला जरा अधिक प्रीती   

काळी जरी मी सख्या
पण तुझ्या साठीच उमलले
तू फिरून पहिले नाहीस
आणि माझे निर्माल्य झाले

मनाला का कारावास
ती सागरावरची तरंग आहे
भिर भिरणाऱ्या वार्याचा पंख आहे
 श्वास कोंडून इथे कुणी कधी का जगले ??
शिस्तीचे आयुष्य कुणास उमजले ??

कवितेच्या कवेत मला जरा रुजू दे
तुझ्या भावनेत मला बसू दे
लेखणीच्या नाकावारचे राग थोडे कमी होईल
तिच्या कुशीत मला आज निजू दे..........  

किती लटका नखरा हिचा
तुझ्या नावावर थबकते
जणू काही माझ्या पेक्षा
ही चं तुझ्यावर जीव ओवाळते  

एक ना जरा

एक ना जरा हाक त्या मनाची
कुजबुज माझ्या शब्दांची
मावळत्या सूर्याने सजवलेली
नदी काठी सांज वेळी
शांतता त्या ओढ्याची  ..........

एक ना जरा पडताना
अबोलीचे पुष्प तुझ्या अंगणी
सलतील काटे वेच धीर धरुनी
आणि सल उरलेली माझ्या मनी ...
 
एक ना जरा ते गाणे हृदयाचे
हसणाऱ्या डोळ्यांचे
मुक्या शब्दांचे
आणि भाव या मनाचे ....

एक ना जरा त्या सरीचे गाऱ्हाणे
त्यांना हि आवडते मेघाच्या कुशीत राहणे
पण ओढ धरणी ला भेटायची काही सुटेना
तसेच जसे प्रीतीचे धागे तुझ्या पासून तुटेना...